मंगळवार, जानेवारी ११, २०११

प्रेम की सहनशक्ती

 
 
तिची वाट पाहाणे प्रेम आहे
                                         तिचा थाट सहने प्रेम आहे
क्रिककेटची मॅच सुरू असताना तिच्यासोबत
                                     समुद्राची लाट पाहाणे प्रेम आहे

तिच्या गिफ्टसाठी पैशे वाचवणे प्रेम आहे
                    ऐका इशर्यावर स्वःताला नाचवणे प्रेम आहे
फक्त नॉनवेज जोकची सवय असताना
                                 तिचा संटा बंटा पचवणे प्रेम आहे

तिचा फोटो खीश्यात ठेवणे प्रेम आहे
               आपलाचा चेहरा आरश्यात भावाने प्रेम आहे
रूम वर मित्राची पार्टी सुरू असताना
         तिच्यासोबत बाहेर पालकपनीर जेवणे प्रेम आहे

पॉकेट मधल्या पैश्याचा शेवट असणे प्रेम आहे
               तिच्या भावाच्या भीतीचा सावट असणे प्रेम आहे
नेहमी  'भ' च्या शिव्या देणर्‍याच्या
                                    तोंडी चावट असणे प्रेम आहे
 
 मुलगाअसून लाजने प्रेम आहे
        चिडवायाच्या भीतीने मित्रांन दारू पाजने प्रेम आहे
पाण्याच्या थेंबाने सर्दि होत असतांना
                               तिच्यासोबत पावसात भीजणे प्रेम आहे

धूम्रपान वगैरे सोडणे प्रेम आहे
                                   देवाचे सोमवार पाळणे प्रेम आहे
पाळीव प्राण्यांना परम शत्रु समाजात असतांना
                                    तिचा कुत्रा आवाडने प्रेम आहे
 
नवीन ट्रेंड्च्या ट्रॅकमधे  राहणे प्रेम आहे
   पॉकेटमनीचा पैसा मॅसेज पॅकामधे वाहने प्रेम आहे
लवस्टोरीचा भयानक राग येत असताना
                       तो मूवी ब्लॅकामधे पाहणे प्रेम आहे
 
एकून काय तर स्वताः तहाणले राहून
              तिच्यासाठी वाळवंटात पाणी पाहणे प्रेम
आयुष्यभर सहन करणे
               आणी सहन करतच राहणे प्रेम आ

ऐक क्वार्टर कमी पडते

दारु काय गोष्ट आहे
           मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
           मला काहीच चढली नाही
सर्व सुरळीत सुरु असताना
        लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
           ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
     वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
        सकाळच्या आत विसरते
मी इतकीच घेणार असा
        प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्‍यापेक्षा मोठा  असतो
स्वताच्या स्वार्थासाठी
  प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
           ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा  कार्यक्रम  पीणार्‍याला
                   दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा
                      क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत
   ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
      देशीवरही तहान् भागवतात
शेवटी काय दारु दा‍रु असते
                       कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
           ऐक क्वार्टर कमी पडते

पीणार्‍यामध्ये प्रेम हा
           चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
         मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची
          आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
  ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
                   लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
             ऐक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर
           वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
           P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
        यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
    गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो
                    तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
              ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
                   यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
           गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
पैशे काय आहे ते फक्त
          खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
    सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
रात्री थोडी जास्त झाली
                        मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
              ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपाण हा
       आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
       तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते
                यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
                     त्या क्षणी राजा असते
याच्यामुळे आपल्याला घराच्या
               चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
           ऐक क्वार्टर कमी पड

सोमवार, जानेवारी १०, २०११

प्रेमाचा अतिरेक

ती इतके प्रेम का दाखवते
              मला गणित काही कळत नाही
कुणी अर्ध बोईल अन्ड खायला
               बियर ची कॅन उघडत नाही
म्हणते की तुझ्याविना जगू शकत नाही
               तू प्रत्येक क्षण खास केला
मला थोड्यावेळ माझ्याविषयी
      मी प्राण वायू असल्याचा भास झाला
हातात हात घेऊन चांदणे बघू
                                 हा काय खेळ आहे
याचा अर्थ की आपण रिकामे आहो
                    आपल्याकडे बराच वेळ आहे
प्रत्येक शब्दमागे दाखवायचे की
       मी तुझी फार काळजी करते
सकाळी सहा वाजत फोन करून
            जेवण झाले का 
विचारते
हे काय, ते कस, अस का
       प्रत्येक शब्दमागे एक प्रश्न फुटते
आयुष्य हे आयुष्य  नसून
            व्हायवा असल्या सारख वाटते

सोनू ,सोन्या ही घरून सुटलेली विशेषण
          आता परत ऐकावी लागतात
पोरांना जन्म देण्याच्या वयात
     लोक पोरांसारखी कसे काय वा
गतात
सकाळी दहावेळा गुड मॉर्निंग
        आणि रात्री वीस वेळा गुड नाइट
दीडशे वर्ष केलेल्या गुलामीचे
       मला आता जास्त वाटते वाईट 

रोज तीच  बाग तोच बाकडा
         संध्याकाळी तिथेच भेटायचे
काल  संपलेले विषय
        आज पहिले पासून रटायचे
खोटी स्तुती करून आणि ऐकून
         मी फार   थकून जातो
आईना मुझसे मेरी पहिलिसी सुरत मागे
           हीच ऐईक गझल ऐकून घेतो


           

सोमवार, नोव्हेंबर २९, २०१०

शब्द

"शब्द कधी सुचतात कधी सुचत नाही
कधी रुचातात कधी रुचत नाही
कधी पचतात कधी पचत नाही
आणि कधी बोचतात तर कधी बोचत नाही"