ती इतके प्रेम का दाखवते
मला गणित काही कळत नाही
कुणी अर्ध बोईल अन्ड खायला
बियर ची कॅन उघडत नाही
म्हणते की तुझ्याविना जगू शकत नाही
तू प्रत्येक क्षण खास केला
मला थोड्यावेळ माझ्याविषयी
मी प्राण वायू असल्याचा भास झाला
हातात हात घेऊन चांदणे बघू
हा काय खेळ आहे
याचा अर्थ की आपण रिकामे आहो
आपल्याकडे बराच वेळ आहे
प्रत्येक शब्दमागे दाखवायचे की
मी तुझी फार काळजी करते
सकाळी सहा वाजत फोन करून
जेवण झाले का विचारते
हे काय, ते कस, अस का
प्रत्येक शब्दमागे एक प्रश्न फुटते
आयुष्य हे आयुष्य नसून
व्हायवा असल्या सारख वाटते
सोनू ,सोन्या ही घरून सुटलेली विशेषण
आता परत ऐकावी लागतात
पोरांना जन्म देण्याच्या वयात
लोक पोरांसारखी कसे काय वागतात
सकाळी दहावेळा गुड मॉर्निंग
आणि रात्री वीस वेळा गुड नाइट
दीडशे वर्ष केलेल्या गुलामीचे
मला आता जास्त वाटते वाईट
रोज तीच बाग तोच बाकडा
संध्याकाळी तिथेच भेटायचे
काल संपलेले विषय
आज पहिले पासून रटायचे
खोटी स्तुती करून आणि ऐकून
मी फार थकून जातो
आईना मुझसे मेरी पहिलिसी सुरत मागे
हीच ऐईक गझल ऐकून घेतो