रविवार, फेब्रुवारी ०६, २०११

माझ्या प्रियासीचे नातलग

जस परीक्षा म्हटल की  बॅकलों आले
तस प्रियसि म्हटल की नातलग आले
प्रत्येकजण स्पेशल नमूना आहे
                       हे आता आल कळून
प्रेम पहावे करून
           आणि नातलग पहावे संभाळून 
म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा 
                         आइविना भिकारी
आणि सगळे प्रियकर जगातले 
            प्रियासिच्या आईच्याने लाचारी 
पोरीच्या दिनाचर्येचे मॅनेजमेंट
         सगळे मातोश्रीच्या हस्ते घडते 
ती दिसायला आईवर गेली 
 मला ही एकच गोष्ट तिच्या आईविषयी आवडते 
माझ्या मुलीवर माझे संस्कार आहे
             ती चुकीनेपण मुलांकडे  पाहत नाही
 तिची आई जेंव्हा हे मला सांगते 
           मनात मी हसल्याशिवाय राहत नाही
दिवसभर फ़क्त मुलीची गुणगान 
                कधी डांस तर कधी रांगोळी
स्वयंपाकाची  स्तुति ऐकून
            मला घरी कडू लागते पुरणपोळी
तिच्या घरचे कांदे कापत
         नेहमीच डोळे येतात गळून 
प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||१||

दूसरा महिला वर्ग म्हणजे तिची बहिन
                हिला माझ्यावर फार संशय आहे'
बहिनीवर चोरून लक्ष्य ठेवणारी ही
                पूर्ण नगराचा चर्चेचा विषय आहे
आम्ही कुठे गेलो आणि ही दिसली नाही
                         अस  सहसा  घडत नाही
महिन्याच्या शंभर रुपये पॉकेटमनीत रोज CCD
                   हीच मॅनेजमेंट मला कळत नाही
फार कमी जगा आहे
                  जिथे हिने इतिहास सोडला नाही
हिच्या आईने या मुलीवर संस्कार करायला
                       थोडा वेळ का काढला नाही
मला खात्री आहे 
आमच्या आधी लग्न करेल पळून
प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||2||


आणि पुरुष वर्गात मग भाऊराया 
                 त्याची काय स्तुति करू
गड्याच्या  खास मुलभुत गरजा
                  अन्न वस्त्र आणि दारू
त्याचे भाण्डणे सोडवायला 
    मी किती जना समोर वाकलो आहे
दारूनंतर जो फिरता रंगमच करतो
              ते पाहून मी पकलो आहे 
बँकेत  काम करतात  वडिल 
बैंक स्वतःची असल्यासारखा उधारी करतो
आणि पैशे द्यायची वेळ आल्यावर
          लोकांच्या खिशातून किस्त भरतो
जीना चढने होत नाही
पण दाखवतो किल्ला आला चढून 

प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||3||

तिचे वडिल, जाऊ दे बापच म्हणतो
              पोरिमागचा खास गुरखा आहे
गोलमाल चा तो डायलॉग आठवतो की
         " कौन कहता है हिटलर मर चूका है "
चुकीने पण मुलीला कुठे एकटे
                कुणाकडे पठावत नाही 
लास्ट टाइम हा मानुस कधी हसला
               मला तरी आठवत नाही
जरा तिला उशीर झाला 

           की लगेच सुरु करतात कुरकुर
 मी हात मागायला गेलो तर मलाच म्हणेल
                " ये हात मुझे  देदे ठाकुर "
आता भीती वाटते 
पण जे घडायचे ते गेले घडून 
प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||4||

शनिवार, फेब्रुवारी ०५, २०११

मी सायन्सचा ती आर्टची


मी सायन्सचा ती आर्टची
मी ईयरचा ती पार्टची 
दोघांच्या मध्ये नेहमीच आल्या
आमच्या आवडीनिवडी
आम्हला त्यांचे प्रेम देवदास
त्यांना आमचे देवडी
सोबत पार्टी करायची म्हटले तर
आमच्या पार्टीत मुले  समोर बीयर
त्यांच्या पार्टीत मुली 
समोर सगळे शेक्सपीयर
एकदाचा अनुभव आहे
ते पार्टीत भयानक छळतात
एन्जॉयमेन्ट च्या नावावर
गाण्याच्या भेंड्या खेळतात
आपण त्यात उतरायचे म्हणजे
तर लगेच होइल अरे तुरे
कारण त्यांचा ‘’ भैय्या मेरे
आणि आपला भीगे होट तेरे
पाच मिनीट लगतील प्रेमच्या पार्टीचा मर्डर व्हायला फारतर
आम्हला त्यांचे प्रेम बासुंदी
त्यांना आमचे क्वार्टर ||||

पीक्चरचा प्लान म्हणजे
डोक्याला वेगळाच ताप आहे
कारण त्यांच्यासमोर हाँलीवुडचा
‘H’ 
सुद्धा पाप आहे
मी म्हटले ही तुमची उगाचीच विक्रुती आहे
पण त्यांच्यानुसार कपडे घालने
हीच आपली संस्क्रुती आहे
तीच्या संस्क्रुतीच्या भावना
मी कीत्येकवेळ टॉलरेट केल्या
मनात म्हटले ईंग्रजांनी अजींटा वेरुळ लेन्या भारतात मायग्रेट केल्या
ती थेटरजवळ दिसली तरी विचारत नाही
पीक्चरला चालली का
आम्हला त्यांचे प्रेम मस्तानी
त्यांना आमचे मल्लीका ||||

बरं ट्रीप च्या बाबतीत
वेगळीच व्यथा आहे
त्यांच्यात सनसेट दुपारी
पहाण्याची प्रथा आहे
आपला टुर म्हणजे बीच,वॉटरफॉल त्यांच्या भाषेत धबधबा
त्यांच्यानध्ये फक्त धार्मीक स्थळांचा दबदबा
ती म्हणाली जुन्या ट्रीपचे
अजुन् डोळ्यासमोर आहे चित्र
प्रवासात गावाच्या भेंड्या तिथे गेल्यावर मामाचे पत्र
तीची ट्रीपची मजा ऐकुन वाटले
लगेच ङोक्याचा दवाखाना पाहु
आम्हला त्यांचे प्रेम देहु
त्यांना आमचे जुहु ||||

गप्पा करायच्या तर
जगावेगळे वीषय मांडतात
"
हम दिल चुकेमध्ये
सल्लु की ऐश बरोबर यावर भांडतात
चंद्र सुर्य तारे या
र्नीजीव जगातच फीरतात
प्रेमीका सोडुन गेली तर
"
तेरे नामची हेयर स्टाईल करतात
त्यांच ऐक जोडपे बघुन कळले
अशक्य आहे चढणे ही पायरी
त्याच्या एका हातात फुल
                                             दुसर्‍र्या हाता तीच्यवरेवरील चारोळ्याची डायरी ||||