रविवार, फेब्रुवारी ०६, २०११

माझ्या प्रियासीचे नातलग

जस परीक्षा म्हटल की  बॅकलों आले
तस प्रियसि म्हटल की नातलग आले
प्रत्येकजण स्पेशल नमूना आहे
                       हे आता आल कळून
प्रेम पहावे करून
           आणि नातलग पहावे संभाळून 
म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा 
                         आइविना भिकारी
आणि सगळे प्रियकर जगातले 
            प्रियासिच्या आईच्याने लाचारी 
पोरीच्या दिनाचर्येचे मॅनेजमेंट
         सगळे मातोश्रीच्या हस्ते घडते 
ती दिसायला आईवर गेली 
 मला ही एकच गोष्ट तिच्या आईविषयी आवडते 
माझ्या मुलीवर माझे संस्कार आहे
             ती चुकीनेपण मुलांकडे  पाहत नाही
 तिची आई जेंव्हा हे मला सांगते 
           मनात मी हसल्याशिवाय राहत नाही
दिवसभर फ़क्त मुलीची गुणगान 
                कधी डांस तर कधी रांगोळी
स्वयंपाकाची  स्तुति ऐकून
            मला घरी कडू लागते पुरणपोळी
तिच्या घरचे कांदे कापत
         नेहमीच डोळे येतात गळून 
प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||१||

दूसरा महिला वर्ग म्हणजे तिची बहिन
                हिला माझ्यावर फार संशय आहे'
बहिनीवर चोरून लक्ष्य ठेवणारी ही
                पूर्ण नगराचा चर्चेचा विषय आहे
आम्ही कुठे गेलो आणि ही दिसली नाही
                         अस  सहसा  घडत नाही
महिन्याच्या शंभर रुपये पॉकेटमनीत रोज CCD
                   हीच मॅनेजमेंट मला कळत नाही
फार कमी जगा आहे
                  जिथे हिने इतिहास सोडला नाही
हिच्या आईने या मुलीवर संस्कार करायला
                       थोडा वेळ का काढला नाही
मला खात्री आहे 
आमच्या आधी लग्न करेल पळून
प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||2||


आणि पुरुष वर्गात मग भाऊराया 
                 त्याची काय स्तुति करू
गड्याच्या  खास मुलभुत गरजा
                  अन्न वस्त्र आणि दारू
त्याचे भाण्डणे सोडवायला 
    मी किती जना समोर वाकलो आहे
दारूनंतर जो फिरता रंगमच करतो
              ते पाहून मी पकलो आहे 
बँकेत  काम करतात  वडिल 
बैंक स्वतःची असल्यासारखा उधारी करतो
आणि पैशे द्यायची वेळ आल्यावर
          लोकांच्या खिशातून किस्त भरतो
जीना चढने होत नाही
पण दाखवतो किल्ला आला चढून 

प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||3||

तिचे वडिल, जाऊ दे बापच म्हणतो
              पोरिमागचा खास गुरखा आहे
गोलमाल चा तो डायलॉग आठवतो की
         " कौन कहता है हिटलर मर चूका है "
चुकीने पण मुलीला कुठे एकटे
                कुणाकडे पठावत नाही 
लास्ट टाइम हा मानुस कधी हसला
               मला तरी आठवत नाही
जरा तिला उशीर झाला 

           की लगेच सुरु करतात कुरकुर
 मी हात मागायला गेलो तर मलाच म्हणेल
                " ये हात मुझे  देदे ठाकुर "
आता भीती वाटते 
पण जे घडायचे ते गेले घडून 
प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||4||

५ टिप्पण्या: