रविवार, जानेवारी २३, २०११

पहिल्या पेगचे समाधान

काही क्षणा आधी ज्याला आयुष्यभराची खंत असते
दोन घोट पोटात गेल्यावर तो ऋषि मुनी सारखा शांत बसते
मला माहीत नाही दारू चमत्कार आहे की वरदान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

म्हणतात की पिण्याचे कारण म्हणजे काहीतरी कष्ट आहे
पण इतक्या नियमीत उत्साहाने होणारी दारूच एक गोष्ट आहे
दारुत मत जुळतात दारुत मत भिडतात
तोंडावरचे तेजच बदलते जेंव्हा बाटली उघडतात
परीक्षेत पेनाला नाही तेवढा इथ ओपनरला मान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे 

कुणासाठी सोडा कुणासाठी कोल्ड्रिन्क आणि कुणासाठी आईस
तडजोड क्वचितच जमते प्रत्येक जन बनतो रईस
ऐखादा साहेब आल्याप्रमाणे चकण्याचा दुकानदार यांचयसमोर वाकतो
पन्नासासाठी कचकच करणारा याना पाचाशेची चिल्लर कशी देऊ शकतो 
हे सगळ साहित्य म्हणजे या संमेलनाची विशेष शान आहे 
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

तू पेग बनव तू चांगला बनवतो अशी मुद्दामच एकमेकाची स्तुती
लग्न घटीकेची वाट पाहणार्‍या बापासारखी सगळ्यांची परिस्थिती
चला सुरवात करू असे कोणीतरी सर्वातर्फे बोलतो
आणि दारूची बाटली उघडून मुद्द्यालाच हात घालते
मग काय ऐकदा बाटली फुटल्यावर सगळ मोकळ रान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

थर्टि सिक्स्टी चे पेग न मोजता अतिशय परफेक्ट बनतात
कुणी मुलांना धुतल्या तान्द्ळा सारखे कसे काय म्हणतात
सगळ्या संस्कारचे इथ व्यवस्थीत हवन घातले आहे
आजकाल चे हे सगळे तांदूळ दारुने धुतले आहे
दारूचा एक थेंब वाया जाणे फार घोर अपमान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

पहला पेग जीभीला लागल्यावर वातावरण एकदम स्वरबद्ध 
पहिला प्याला लीहल असते तर अत्रे जास्त झाले असते प्रसिद्ध
सगळ्या स्वर्गाची मजा पहिल्याच घोटात येते
रम्भा थोड्यावेळा पुरती जिभेवर आणि मेनका ओठात येते
मग इन्द्रसारखे वाटायला लागल्यावर कुणाला कसले भान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

आता सर्व चर्चा खुलतात विषयाला विषय निघतात
पहिल्या पेग संपवायची आधी दुसर्‍याची वाट बघतात
कधी पेग चोरणे तर कधी चोरून भरणे
एकमेकाला पाजण्यसाठी  हजारो कारणे
कधी मैत्रीत कधी शर्यतीत तर कधी तिच्या विरहात
पिण्यकरीता नेहामीच तत्पर असतात चार हात
त्या क्षणसाठी वाटते की का  कुणी  म्हणते दारू घाण  आहे 
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे







४ टिप्पण्या: