रविवार, फेब्रुवारी ०६, २०११

माझ्या प्रियासीचे नातलग

जस परीक्षा म्हटल की  बॅकलों आले
तस प्रियसि म्हटल की नातलग आले
प्रत्येकजण स्पेशल नमूना आहे
                       हे आता आल कळून
प्रेम पहावे करून
           आणि नातलग पहावे संभाळून 
म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा 
                         आइविना भिकारी
आणि सगळे प्रियकर जगातले 
            प्रियासिच्या आईच्याने लाचारी 
पोरीच्या दिनाचर्येचे मॅनेजमेंट
         सगळे मातोश्रीच्या हस्ते घडते 
ती दिसायला आईवर गेली 
 मला ही एकच गोष्ट तिच्या आईविषयी आवडते 
माझ्या मुलीवर माझे संस्कार आहे
             ती चुकीनेपण मुलांकडे  पाहत नाही
 तिची आई जेंव्हा हे मला सांगते 
           मनात मी हसल्याशिवाय राहत नाही
दिवसभर फ़क्त मुलीची गुणगान 
                कधी डांस तर कधी रांगोळी
स्वयंपाकाची  स्तुति ऐकून
            मला घरी कडू लागते पुरणपोळी
तिच्या घरचे कांदे कापत
         नेहमीच डोळे येतात गळून 
प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||१||

दूसरा महिला वर्ग म्हणजे तिची बहिन
                हिला माझ्यावर फार संशय आहे'
बहिनीवर चोरून लक्ष्य ठेवणारी ही
                पूर्ण नगराचा चर्चेचा विषय आहे
आम्ही कुठे गेलो आणि ही दिसली नाही
                         अस  सहसा  घडत नाही
महिन्याच्या शंभर रुपये पॉकेटमनीत रोज CCD
                   हीच मॅनेजमेंट मला कळत नाही
फार कमी जगा आहे
                  जिथे हिने इतिहास सोडला नाही
हिच्या आईने या मुलीवर संस्कार करायला
                       थोडा वेळ का काढला नाही
मला खात्री आहे 
आमच्या आधी लग्न करेल पळून
प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||2||


आणि पुरुष वर्गात मग भाऊराया 
                 त्याची काय स्तुति करू
गड्याच्या  खास मुलभुत गरजा
                  अन्न वस्त्र आणि दारू
त्याचे भाण्डणे सोडवायला 
    मी किती जना समोर वाकलो आहे
दारूनंतर जो फिरता रंगमच करतो
              ते पाहून मी पकलो आहे 
बँकेत  काम करतात  वडिल 
बैंक स्वतःची असल्यासारखा उधारी करतो
आणि पैशे द्यायची वेळ आल्यावर
          लोकांच्या खिशातून किस्त भरतो
जीना चढने होत नाही
पण दाखवतो किल्ला आला चढून 

प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||3||

तिचे वडिल, जाऊ दे बापच म्हणतो
              पोरिमागचा खास गुरखा आहे
गोलमाल चा तो डायलॉग आठवतो की
         " कौन कहता है हिटलर मर चूका है "
चुकीने पण मुलीला कुठे एकटे
                कुणाकडे पठावत नाही 
लास्ट टाइम हा मानुस कधी हसला
               मला तरी आठवत नाही
जरा तिला उशीर झाला 

           की लगेच सुरु करतात कुरकुर
 मी हात मागायला गेलो तर मलाच म्हणेल
                " ये हात मुझे  देदे ठाकुर "
आता भीती वाटते 
पण जे घडायचे ते गेले घडून 
प्रेम पहावे करून
आणि नातलग पहावे संभाळून ||4||

शनिवार, फेब्रुवारी ०५, २०११

मी सायन्सचा ती आर्टची


मी सायन्सचा ती आर्टची
मी ईयरचा ती पार्टची 
दोघांच्या मध्ये नेहमीच आल्या
आमच्या आवडीनिवडी
आम्हला त्यांचे प्रेम देवदास
त्यांना आमचे देवडी
सोबत पार्टी करायची म्हटले तर
आमच्या पार्टीत मुले  समोर बीयर
त्यांच्या पार्टीत मुली 
समोर सगळे शेक्सपीयर
एकदाचा अनुभव आहे
ते पार्टीत भयानक छळतात
एन्जॉयमेन्ट च्या नावावर
गाण्याच्या भेंड्या खेळतात
आपण त्यात उतरायचे म्हणजे
तर लगेच होइल अरे तुरे
कारण त्यांचा ‘’ भैय्या मेरे
आणि आपला भीगे होट तेरे
पाच मिनीट लगतील प्रेमच्या पार्टीचा मर्डर व्हायला फारतर
आम्हला त्यांचे प्रेम बासुंदी
त्यांना आमचे क्वार्टर ||||

पीक्चरचा प्लान म्हणजे
डोक्याला वेगळाच ताप आहे
कारण त्यांच्यासमोर हाँलीवुडचा
‘H’ 
सुद्धा पाप आहे
मी म्हटले ही तुमची उगाचीच विक्रुती आहे
पण त्यांच्यानुसार कपडे घालने
हीच आपली संस्क्रुती आहे
तीच्या संस्क्रुतीच्या भावना
मी कीत्येकवेळ टॉलरेट केल्या
मनात म्हटले ईंग्रजांनी अजींटा वेरुळ लेन्या भारतात मायग्रेट केल्या
ती थेटरजवळ दिसली तरी विचारत नाही
पीक्चरला चालली का
आम्हला त्यांचे प्रेम मस्तानी
त्यांना आमचे मल्लीका ||||

बरं ट्रीप च्या बाबतीत
वेगळीच व्यथा आहे
त्यांच्यात सनसेट दुपारी
पहाण्याची प्रथा आहे
आपला टुर म्हणजे बीच,वॉटरफॉल त्यांच्या भाषेत धबधबा
त्यांच्यानध्ये फक्त धार्मीक स्थळांचा दबदबा
ती म्हणाली जुन्या ट्रीपचे
अजुन् डोळ्यासमोर आहे चित्र
प्रवासात गावाच्या भेंड्या तिथे गेल्यावर मामाचे पत्र
तीची ट्रीपची मजा ऐकुन वाटले
लगेच ङोक्याचा दवाखाना पाहु
आम्हला त्यांचे प्रेम देहु
त्यांना आमचे जुहु ||||

गप्पा करायच्या तर
जगावेगळे वीषय मांडतात
"
हम दिल चुकेमध्ये
सल्लु की ऐश बरोबर यावर भांडतात
चंद्र सुर्य तारे या
र्नीजीव जगातच फीरतात
प्रेमीका सोडुन गेली तर
"
तेरे नामची हेयर स्टाईल करतात
त्यांच ऐक जोडपे बघुन कळले
अशक्य आहे चढणे ही पायरी
त्याच्या एका हातात फुल
                                             दुसर्‍र्या हाता तीच्यवरेवरील चारोळ्याची डायरी ||||

रविवार, जानेवारी २३, २०११

पहिल्या पेगचे समाधान

काही क्षणा आधी ज्याला आयुष्यभराची खंत असते
दोन घोट पोटात गेल्यावर तो ऋषि मुनी सारखा शांत बसते
मला माहीत नाही दारू चमत्कार आहे की वरदान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

म्हणतात की पिण्याचे कारण म्हणजे काहीतरी कष्ट आहे
पण इतक्या नियमीत उत्साहाने होणारी दारूच एक गोष्ट आहे
दारुत मत जुळतात दारुत मत भिडतात
तोंडावरचे तेजच बदलते जेंव्हा बाटली उघडतात
परीक्षेत पेनाला नाही तेवढा इथ ओपनरला मान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे 

कुणासाठी सोडा कुणासाठी कोल्ड्रिन्क आणि कुणासाठी आईस
तडजोड क्वचितच जमते प्रत्येक जन बनतो रईस
ऐखादा साहेब आल्याप्रमाणे चकण्याचा दुकानदार यांचयसमोर वाकतो
पन्नासासाठी कचकच करणारा याना पाचाशेची चिल्लर कशी देऊ शकतो 
हे सगळ साहित्य म्हणजे या संमेलनाची विशेष शान आहे 
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

तू पेग बनव तू चांगला बनवतो अशी मुद्दामच एकमेकाची स्तुती
लग्न घटीकेची वाट पाहणार्‍या बापासारखी सगळ्यांची परिस्थिती
चला सुरवात करू असे कोणीतरी सर्वातर्फे बोलतो
आणि दारूची बाटली उघडून मुद्द्यालाच हात घालते
मग काय ऐकदा बाटली फुटल्यावर सगळ मोकळ रान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

थर्टि सिक्स्टी चे पेग न मोजता अतिशय परफेक्ट बनतात
कुणी मुलांना धुतल्या तान्द्ळा सारखे कसे काय म्हणतात
सगळ्या संस्कारचे इथ व्यवस्थीत हवन घातले आहे
आजकाल चे हे सगळे तांदूळ दारुने धुतले आहे
दारूचा एक थेंब वाया जाणे फार घोर अपमान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

पहला पेग जीभीला लागल्यावर वातावरण एकदम स्वरबद्ध 
पहिला प्याला लीहल असते तर अत्रे जास्त झाले असते प्रसिद्ध
सगळ्या स्वर्गाची मजा पहिल्याच घोटात येते
रम्भा थोड्यावेळा पुरती जिभेवर आणि मेनका ओठात येते
मग इन्द्रसारखे वाटायला लागल्यावर कुणाला कसले भान आहे
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे

आता सर्व चर्चा खुलतात विषयाला विषय निघतात
पहिल्या पेग संपवायची आधी दुसर्‍याची वाट बघतात
कधी पेग चोरणे तर कधी चोरून भरणे
एकमेकाला पाजण्यसाठी  हजारो कारणे
कधी मैत्रीत कधी शर्यतीत तर कधी तिच्या विरहात
पिण्यकरीता नेहामीच तत्पर असतात चार हात
त्या क्षणसाठी वाटते की का  कुणी  म्हणते दारू घाण  आहे 
एका पेग नंतर जे डोळ्यात दिसत, ते वेगळेच समाधान आहे







मंगळवार, जानेवारी ११, २०११

Recession, software और प्यार

जब से Recession आया
                जीन्दगी सजा  हो गयी है
A.R. Rahman थी मेरी Love life
           अब अल्ताफ राजा हो गयी है
वो कहती थी तुम्हे मुझ्।से प्यार
    Company और Payment है
GF तुम्हारे लीये
                   Weekend  काEntertainment है

मै समझाता था की
             तु फाल्तू मे रोति है
हमारी software वालो की जीन्दगी
      फिल्म Actress जैसि होति है

Actress कहति है कि मै expose करुगि
                        अगर Script की मांग है
हम कहते है ज्यादा काम करेंगे
               जब Project कि Demand  है

दिल की बात कहु तो
                दोनो  जरुरी है
expose करना उसकीकाम करना
                  हमारी मजबुरी है
अब तो झगडे भी नही होते दोस्तो

 
क्युंकी जब से Recession आया
                जीन्दगी खंडर हो गयी है
Chennai super king थी मेरी Love life
         अब Kolkata knight rider हो गयी 
पहेले दीनभर कॉल करके
          मेरा status करती थी चेक
आजकल तो पांच minute के कॉल भी
            लेती है Strategy break
कॉल कर कॉल कर ऐसी
            हमेशा कि  उसकी कीटपीट
अब तो NO ball समझके
        मेरे कॉल को मारती है फ्री हीट
कॉल ऐसा रखती है की
               करनी कोई बात नही
दिखाना होत है की अब
 मेरी बील देनी कि औकात नही

Miscal भी नही आते दोस्तो
क्युंकी जब से Recession आया
          जीन्दगी चुप हो गयी है
Johny walker थी मेरी Love life
     अब Tomato soup हो गयी है

गलतीसे मीलने भी आयी तो ऐसी
         जगह जहा पे Concession है
movie का बोल तो कहति है
       उसी जग जाओगे जहा पे Recession है
 लोग कहते थे Job  है GF है
       तेरी LIFE सेट है
अब तो सपने मे हि project
 और वही पे डेट है

सीधीसाधी थी जीन्दगी दोस्तो
 लेकिन जब से Recession आया
          जीन्दगी इधर-उधर  हो गयी है
Microsoft थी मेरी Love life
     अब Lehamn Brother हो गयी

प्रेम की सहनशक्ती

 
 
तिची वाट पाहाणे प्रेम आहे
                                         तिचा थाट सहने प्रेम आहे
क्रिककेटची मॅच सुरू असताना तिच्यासोबत
                                     समुद्राची लाट पाहाणे प्रेम आहे

तिच्या गिफ्टसाठी पैशे वाचवणे प्रेम आहे
                    ऐका इशर्यावर स्वःताला नाचवणे प्रेम आहे
फक्त नॉनवेज जोकची सवय असताना
                                 तिचा संटा बंटा पचवणे प्रेम आहे

तिचा फोटो खीश्यात ठेवणे प्रेम आहे
               आपलाचा चेहरा आरश्यात भावाने प्रेम आहे
रूम वर मित्राची पार्टी सुरू असताना
         तिच्यासोबत बाहेर पालकपनीर जेवणे प्रेम आहे

पॉकेट मधल्या पैश्याचा शेवट असणे प्रेम आहे
               तिच्या भावाच्या भीतीचा सावट असणे प्रेम आहे
नेहमी  'भ' च्या शिव्या देणर्‍याच्या
                                    तोंडी चावट असणे प्रेम आहे
 
 मुलगाअसून लाजने प्रेम आहे
        चिडवायाच्या भीतीने मित्रांन दारू पाजने प्रेम आहे
पाण्याच्या थेंबाने सर्दि होत असतांना
                               तिच्यासोबत पावसात भीजणे प्रेम आहे

धूम्रपान वगैरे सोडणे प्रेम आहे
                                   देवाचे सोमवार पाळणे प्रेम आहे
पाळीव प्राण्यांना परम शत्रु समाजात असतांना
                                    तिचा कुत्रा आवाडने प्रेम आहे
 
नवीन ट्रेंड्च्या ट्रॅकमधे  राहणे प्रेम आहे
   पॉकेटमनीचा पैसा मॅसेज पॅकामधे वाहने प्रेम आहे
लवस्टोरीचा भयानक राग येत असताना
                       तो मूवी ब्लॅकामधे पाहणे प्रेम आहे
 
एकून काय तर स्वताः तहाणले राहून
              तिच्यासाठी वाळवंटात पाणी पाहणे प्रेम
आयुष्यभर सहन करणे
               आणी सहन करतच राहणे प्रेम आ

ऐक क्वार्टर कमी पडते

दारु काय गोष्ट आहे
           मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
           मला काहीच चढली नाही
सर्व सुरळीत सुरु असताना
        लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
           ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
     वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
        सकाळच्या आत विसरते
मी इतकीच घेणार असा
        प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्‍यापेक्षा मोठा  असतो
स्वताच्या स्वार्थासाठी
  प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
           ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा  कार्यक्रम  पीणार्‍याला
                   दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा
                      क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत
   ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
      देशीवरही तहान् भागवतात
शेवटी काय दारु दा‍रु असते
                       कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
           ऐक क्वार्टर कमी पडते

पीणार्‍यामध्ये प्रेम हा
           चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
         मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची
          आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
  ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
                   लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
             ऐक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर
           वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
           P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
        यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
    गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो
                    तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
              ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
                   यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
           गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
पैशे काय आहे ते फक्त
          खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
    सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
रात्री थोडी जास्त झाली
                        मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
              ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपाण हा
       आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
       तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते
                यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
                     त्या क्षणी राजा असते
याच्यामुळे आपल्याला घराच्या
               चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
           ऐक क्वार्टर कमी पड